तरुणाच्या खून प्रकरणी जिल्हा रुग्णालयासमोर नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन;४ जणांना अटक

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे किशोर अशोक सोनवणे वय-३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव या तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली होती. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गुरुवारी २३ मे रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. या खून प्रकरणात शनीपेठ पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर सोनवणे हा आपला परिवारासह वास्तव्याला आहे. किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता. बुधवार २२मे रोजी रात्री हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनांसाठी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात चार जणांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे

दरम्यान, गुरुवारी २३ मे रोजी जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले होते. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कुटुंबीयांसह इतर नातेवाईकांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नातेवाईकांची प्रचंड प्रमाणावर गर्दी असल्याचे पाहायला मिळाले.

Protected Content