जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या किलबील प्राथमिक शाळेत आज सकाळी विद्यर्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे शाळेच्या परिसरात अगदी खर्याखुर्या अर्थाने शाळेत किलबिलाट दिसून आला.
आजपासून शाळा सुरू होत आहेत. गत अनेक वर्षांपासून सुरू असणार्या परंपरेनुसार प्रत्येक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे. या अनुषंगाने येथील केसीईट सोसायटी संचलीत किलबील प्राथमिक शाळेत ही चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्यांदाच शाळेत आलेली अनेक बालके भेदरून गेल्यामुळे त्यांच्याशी आत्मीयतेने वागत त्यांना वर्गात दाखल करण्यात आले. केसीईचे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी यांच्यासह रत्नप्रभा कुरकुरे, अर्चना चौधरी, मेघा कोल्हे आदींनी या चिमुरड्यांचे स्वागत केले. अनेक विद्यार्थी पहिल्याच दिवशी भेदरून गेल्याने रडू लागले. त्यांना शांत करून वर्गात बसविण्याची कसरत कर्मचार्यांना करावी लागली. तर बर्याच पालकांना शाळेच्या आवारातच थांबावे लागले.