Home क्राईम शिरसोली रोडवरील कृष्णा लॉन समोर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

शिरसोली रोडवरील कृष्णा लॉन समोर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
102

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील कृष्णा लॉन समोर एका वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात वाहनधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, दिनेश दत्तू बारी (वय-५०) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हे जळगाव जिल्हा कारागृहात जेल पोलीस म्हणून नोकरीला आहे. शुक्रवार १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिनेश बारी हे (एमएच ३० एएच ३१५०) क्रमांकाच्या दुकाने जळगाव शहराकडे येत असतांना त्यांना समोरून चुकीच्या दिशेने येणारी वाहन (एमएच १९ डीएफ ८१४१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दिनेश बारी हे जखमी झाले. अपघात होताच कारचालकाने कार घेवून पसार झाला होता. जखमी झालेले दिनेश बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शनिवारी १९ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound