गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये विज्ञान आर्ट मेला उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये चिमुकल्यासह भावी वैज्ञानिकांनी सौर उर्जा, स्वयंचलित रोबोट विज्ञान आर्ट मेळयात सादर करत कल्पकतेची चूणूक दाखवली. २९ जुलै सोमवार रोजी गोदावरी सीबीएसईच्या सभागृहात वार्षिक सायन्स आर्ट मेला मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापिका नीलिमा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या आर्ट मेल्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांच्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट प्रदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी सौर उर्जा, रोबोटिक्स, पर्यावरण संरक्षण, आणि इतर विविध विषयांवर प्रकल्प सादर केले. सौर उर्जा आधारित घर, स्वयंचलित रोबोट आणि पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार केलेले विविध उत्पादने हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू होते होते. शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. पालकांनी देखील या मेळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्कूलच्या समुपदेशक लीना चौधरी व विज्ञान शाखेच्या प्रमुख सौ. प्रिया चौधरी, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि विज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष आणि संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची महत्वाची भूमिका असल्याचे नमूद केले.. सायन्स एक्जीबिशनने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली असून, भविष्यातील शास्त्रज्ञांना प्रोत्साहित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

Protected Content