जळगावात जैन प्रिमीयर लिग स्पर्धेला प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्री जैन युवा फाऊंडेशन व जितो जळगाव चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय जैन क्रिकेट प्रीमिअर लीग टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.

श्री जैन युवा फाऊंडेशन व जितो जळगाव चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने गरुवार ९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी तीन दिवसीय जैन क्रिकेट प्रीमिअर लीग टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धेचे महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते चेंडू टोलवून उद्घाटन झाले. तसेच स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना दिल्या जाणार्‍या करंडकांचे सौ.महाजन व माजी महापौर श्री.रमेशदादा जैन यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ही स्पर्धा 9 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान होत असून, यात १८ संघांच्या माध्यमातून ३०० युवक सामील झालेले आहेत.

याप्रसंगी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी, महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, जैन युवा फाऊंडेशनचे सेक्रेटरी विनय गांधी, जितो जळगावचे चीफ सेक्रेटरी दर्शन टाटिया यांच्यासह उद्योगपती, जैन समाजातील प्रतिष्ठित मंडळी, श्री जैन युवा फाऊंडेशन व जितो जळगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य व जळगावातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content