Home Cities चाळीसगाव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने ध्रुवास राठोड सन्मानित

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने ध्रुवास राठोड सन्मानित

0
35


चाळीसगाव,  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील आश्रम शाळेतील ध्रुवास राठोड यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार-२०२२ ने सन्मानित करण्यात आले. सदर सोहळा पुणे भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पार पडला.

विधान परिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळे, नाशिक पदवीधर आमदार सुधीर तांबे, सिने अभिनेत्री निशीगंधा वाड, समुहाचे अध्यक्ष दिपक चामे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्रुवास राठोड यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. ध्रुवास राठोड यांनी कोविड१९च्या काळात अनेक गावाचा वारंवार स्व:खर्चाने जवळपास हजारो किलोमिटरचा खडतर प्रवास करुन विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सामुग्री पोहचवुन शिक्षणाची ज्ञानज्योत तेवत ठेवण्याचे अतुलनीय कार्य घडविले होते. त्यासह राज्यशासनाद्वारे आयोजित राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या उपक्रमाद्वारे संपुर्ण राज्यातील लाखों शिक्षकांना उपक्रमाविषयी मार्गदर्शनाचे कार्य केलेले आहेत. विद्यार्थी गुणवत्तेकरीता विशेषत: गणित, विज्ञान, भूगोल विषयासंबंधित अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राठोड राबवित असतात. त्यांचे अनेक नवोपक्रम, शैक्षणिक साधने राष्ट्रीय, राज्यस्तरावर व जिल्हापातळीवर यशस्वीरित्या शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारे विद्यार्थी विकासाला, सृजनशिलतेला वाव देणारे ठरले आहे. जागतिक पातळीवरील संस्था ‘युनिसेफ’तर्फेही कोविड काळात निर्मित तंत्रज्ञानयुक्त शैक्षणिक साधन गौरवास पात्र ठरलेले आहे. तसेच वाचन संस्कार, स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती सारखे समाजाभिमुख उपक्रम वेगवेगळ्या साधनांची निर्मिती करुन विद्यार्थीसह पालकांमध्ये जाणीव, जनजागृती घडविली आहे. तसेच रविवार असो वा सणोत्सववार या दिवशीही अविरतपणे कर्तृत्व पार पाडणारे राठोड यांच्या भरीव उल्लेखनीय कार्याची सदर महाराष्ट्र शिक्षक पॅनलद्वारे दखल घेऊन गौरविण्यात आले. याकरीता सदर कार्यक्रमास यावेळी उपस्थित असलेले संस्थापक अध्यक्ष दिपक चामे,जळगाव जिल्हा प्रतिनिधी पंकज पालिवाल व रावसाहेब राऊळ तसेच राज्यभरातील समुहाचे पदाधिकारी सतिश कोळी, भगवान जायभावे, गिरीष दारूंटे, जयश्री पाटील, विद्या बेडसे, मकरंद आहेर या सदस्यांकडुन अभिनंदन करण्यात आले.

 


Protected Content

Play sound