एससी-एसटी रेल्वे असोशिएशनचा डीआरएम कार्यालयावर मोर्चा (व्हिडीओ)

bhus

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारचे कामकाज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालत नाहीय. त्यामुळे सरकारला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला सामारे जावे लागेल, असा इशारा देत ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे-कर्मचारी असोशिएशनच्या वतीने आज डी.आर.एम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी सरकारच्या कामगाराच्या धोरणांविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हातात झेंडे, मागण्याचे फलक घेतले होते. यावेळी असोशिएशन मंडळाचे सचिव आर.सी.राऊत म्हणाले की, यांनी केंद्र सरकारच्या मनमानी करत असून रेल्वे मंत्रालयाने रेल्वेला खासगीकरणाच्या दिशेने नेत असल्यामुळे देशभरात आंदोलन उभारून सरकारचे प्रयत्न हाणून पाडू, असेही त्यांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाविरुद्ध रेल्वे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या धोरणांचा निषेध नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रेल्वेसाठी उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचे खासगीकरण थांबवावे, रेल्वे कोच फॅक्टरी, मॉडर्न कोच फॅक्टरी, भुसावळ पीओएचचे खासगीकरण थांबवावे. तसेच रेल्वेच्या धोरणांमुळे कर्मचारी व्हीआरएस घेतात. त्यामुळे असे धोरण रद्द करून कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे कर्मचारी असोशियन ने निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content