Home धर्म-समाज भुसावळ येथे पाणपोईचे उद्घाटन (व्हिडीओ)

भुसावळ येथे पाणपोईचे उद्घाटन (व्हिडीओ)

0
37


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरिमाता चौकात असलेल्या तेरापंथ शीतल जल या स्वर्गीय मोतीलालजी लखीचंद निमाणी व स्वर्गीय सुजित रमेश कोठारी यांच्या स्मरणार्थ आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आर.ओ.प्लँट पाणपोईचे उद्घाटन समाजसेवक रमेशचंद कोठारी व कांचन बाई निमाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

मरीमाता चौकामध्ये  1987 साली  पाणपोई सुरू करण्यात आली होती .  आज तिचा जिर्णोद्धार करण्यात आला. शहरातील मरीमाता चौक हा बाजाराचा मुख्य भाग आहे .  याठिकाणी हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते . त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भुसवळकरांची  सेवा करण्याच्या  मुख्य उद्देशाने आर.ओ .प्लँट  पाणपोई सुरू करण्यात आली असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी म्हटले आहे  .लोकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता आर .ओ. प्लँट लावून लोकांना शुद्ध पाणी देण्याचा मानस असल्याचेही नगरसेवक पिंटू कोठारी यांनी म्हटले आहे .

https://www.facebook.com/watch/?v=197062288667135

 


Protected Content

Play sound