फुप्पुसांतील पेशींच्या प्रथिनांमध्ये दडलेला नवा कोरोना आरटीपीसीआर चाचणीमध्येही सापडत नाही !!

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था ।  फुप्पुसांतील पेशींच्या प्रथिनांमध्ये दडलेला नवा कोरोना आरटीपीसीआर  चाचणीमध्येही सापडत नाही अशा वृत्ताला दिल्लीतील डॉक्टरांनी दुजोरा दिल्यामुळे सगळ्यांचीच धडधड पुन्हा वाढली आहे 

 

भारतातील कोरोनाची दुसरी लाट विनाशकारी आहे. कोरोना विषाणूच्या नव्या अवतारामुळे रुग्णांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झालीय. रुग्ण पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार हा अतिशय धोकादायक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बर्‍याच प्रकरणांमध्ये  आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतरही या विषाणूचा संसर्ग आढळलेला नाही.

 

 

दिल्लीतील बर्‍याच हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, असे अनेक रुग्ण सापडलेत, ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांची आरटीपीसीआर  चाचणीही निगेटिव्ह येत आहे. अनेक वेळा अशी  चाचणी करूनही कोरोना झाल्याचं निदान होत नाहीये. आकाश हेल्थकेअरचे संचालक डॉ. आशिष चौधरी सांगतात, ‘गेल्या काही दिवसांत आपल्याकडे असे बरेच रुग्ण सापडलेत. त्यांना ताप आला होता, श्वास घेण्यास त्रास झाला होता आणि फुफ्फुसांचा एक्स रे केल्यानंतर हलक्या रंगाचे किंवा राखाडी रंगाचे डाग दिसू लागले. हे कोरोनाचे एक नवीन लक्षण आहे.’

 

त्यांनी पुढे असेही सांगितले की, अशा प्रकारच्या रुग्णांच्या तोंडात किंवा नाकात लवचिक उपकरण टाकून फुफ्फुसांमध्ये नेले जाते आणि ते द्रवपदार्थ गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याची खातरजमा होते. या प्रक्रियेस ब्रॉन्कोलवेलार लॅवेज (बीएएल) म्हणतात. डॉ. चौधरी म्हणाले की, कोरोनाची लक्षणे असलेले सर्व रुग्ण, जे सामान्य चाचणीमध्ये निगेटिव्ह आले होते, या प्रक्रियेद्वारे घेतलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत.

 

लिव्हर अँड बायलरी सायन्सेसच्या क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतिभा काळे म्हणतात, “नाक किंवा घशाला विषाणूने इन्फेक्टेड केलेले नाही, त्यामुळेच स्वॅब तपासणीत विषाणूचा शोध लागलेला नाही. “त्यांनी पुढे असेही सांगितले की, एस. रिसेप्टर्समध्ये व्हायरसने जागा मिळविली. हे एस रिसेप्टर्स फुफ्फुसांच्या पेशींमध्ये आढळणारे प्रथिने आहेत. तर जेव्हा द्रवपदार्थाचे नमुने तपासले जातात, तेव्हा कोरोना संक्रमणाची पुष्टी होते.

 

मॅक्स हेल्थकेअरच्या पल्मोनोलॉजी विभाग प्रमुख डॉ. विवेक नांगिया म्हणतात की, सुमारे 15-20 टक्के  रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागलाय, रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसतात. परंतु त्यांची चाचणी निगेटिव्ह येते. अशा रुग्णांना कोरोना रुग्णालयाऐवजी सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले तर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, तसेच संसर्ग न सापडल्यामुळे उपचार लांबणीवर पडतात. डॉक्टर नांगिया म्हणतात की, शेवटच्या वेळेच्या तुलनेत रुग्णांच्या लक्षणांमध्ये बराच बदल झालाय, त्यामुळे विषाणू अवतार बदलत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अरूप बसू म्हणतात की, वाहणारे नाक, सर्दी सारखी लक्षणे देखील रुग्णांमध्ये दिसतात, जी पूर्वी नव्हती. बर्‍याच रुग्णांना कफ होत नाही, श्वास घेण्यात त्रास होत नाही आणि फुफ्फुसांचे सिटी स्कॅन देखील सामान्य आहे, परंतु 8-9 दिवस सतत ताप असतो, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

 

Protected Content