यावल येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी . पी .बोरसे हे होते.यावेळी व्यासपीठावर  ज्येष्ठ शिक्षक आर .जे. महाजन , वाय. एस .सोनवणे, एस .पी. निळे भाऊसाहेब,बी. ई. महाजन, किरणकुमार चौधरी हे प्रामुख्याने या कार्यक्रमास उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात येवुन सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अपर्ण करण्यात आली . विद्यालयाचे उपशिक्षक वाय. एस. सोनवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी वंदनगीत सादर केले.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य जी .पी. बोरसे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी, स्त्री शिक्षण,बालिका दिन ,अंधश्रद्धा, मुलींचे शिक्षणातील योगदान, केशवपन, बालविवाह याविषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय .बी. सपकाळे यांनी केले तर उपास्थितांचे आभार आर जे महाजन यांनी केले.

Protected Content