यावल येथे इंधर दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलसमोर आंदोलन

यावल प्रतिनिधी । कोराना काळात अनेक जण बेरोजगार झाले आहे. त्यातच आता केंद्र सरकारने वाढदिवेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केली आहे. ही दरवाढ सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असून दरवाढीच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालयासमोर तालुका शिवसेना आंदोलन केले. 

कोरोना संकटामुळे अनेकांचे नोकरी गेली, अनेकांच्या व्यवसाय आणी धंद्यावर गदा आली त्यामुळे नागरीकांचे रोजगार बुडाले संसाराची घडी विस्कटलेली कशी बसवयाची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणुस असतांना केंद्र शासनाकडून सतत होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे आर्थिक संकटात आला असुन देशात पेट्रॉल आणी डिझेलची दरवाढ ही कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणी महागाईचा भडका उडेल. गोंधळल्या परिस्थितीमुळे नागरीकांमध्ये कमाली असंतोष परसले आहे. या महागाईच्या संकटकाळात शिवसेना या देशातील नागरीकांच्या पाठीशी ठामपणे उभी असुन, या परिस्थितीतुन सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी आज ५ फेब्रुवारी रोजी संपुर्ण राज्यासह यावल तालुक्यात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येवून निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आले. याप्रसंगी महसुलचे एम.एफ. तडवी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पप्पु जोशी, किरण बारी, माजी शिवसेना प्रमुख तालुका कडु पाटील, यावल पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यभान तायडे, माजी शिवसेना तालुका प्रमुख विजयसिंग रुपासिंग पाटील, शरद कोळी, संतोष खर्च, आर के चौधरी सर, शकील पटेल, चंद्रकांत सोना चौधरी, रोहीदास महाजन, युवा सेना शहर शाखाप्रमुख सागर देवांग, आदीवासी सेनाचे तालुकाध्यक्ष हुसेन तडवी, मोहसीन खान, अजहर खाटीक, लिलाधर पाटील, हारून खान, देवीदास पाटील, राजेन्द्र पाटील, कृउबाचे संचालक सुनिल बारी, हमीद पटेल, योगेश पाटील महिला सेनेच्या सपना घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. 

Protected Content