पाचोरा येथील गो.से.हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शिक्षण प्रकल्प’ साजरा

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलमध्ये ‘आनंददायी शिक्षण’ हा एक आगळा वेगळा प्रकल्प राबविण्यात आला.

इयत्ता सहावी या वर्गासाठी ‘इंग्रजी’ या विषयांतर्गत ‘हेल्थ फूड’ हा प्रकल्प शिक्षकांनी घेतला. या प्रकल्पात सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. त्यात विद्यार्थी – विद्यार्थिनीनी खमंग ढोकळा, इडली सांबर, मंचुरियन पोहे, पास्ता इत्यादी वेगवेगळी घरगुती पदार्थ बनवून आणले व ते सर्व आपल्या शिक्षकांना व आपल्या मित्रांना चवीने दिले.

हा प्रकल्प विषय शिक्षिका नीता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. तसेच आपल्या घरातील वेगवेगळे पदार्थ पाहून विद्यार्थी भारावले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन.आर. पाटील, चित्रकला शिक्षक प्रमोद पाटील, एन.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content