यावल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीरांना अभिवादन

यावल प्रतिनिधी । येथील शिवसेनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीविरांना अभिवादन करण्यात आले आहे. 

यावल येथील शिवसेनेच्या वतीने आज ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिवस यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा भिल, खाज्या नाईक, भिमा नायक, रानी दुर्गावती अशा थोर आदिवासीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी जागतिक आदीवासी दिनानिमित्त महत्व आपल्या विचारातुन मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी  शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा नगरसेवक दिपक बेहडे, शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, शिवसेने तालुका उपप्रमुख पप्पु जोशी, शिवसेनेचे शहर उपप्रमुख संतोष धोबी, अजहर खाटीक, आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी, आर. के. चौधरी, सागर देवांग, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, योगेश चौधरी, सागर बोरसे, याकूब शेख ( राजु ), विभागप्रमुख योगेश पाटील, विजय पंडीत यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन आदिवासी चळवळीचे थोर क्रांतीविरांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.

 

Protected Content