एरंडोल येथे महिला मंडळांनी साजरी केली सावित्रीबाई फुले जयंती

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  आद्य शिक्षिका तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती एरंडोल शहरातील ९ महिला मंडळांनी मिळून उत्साहात साजरी केली. यावेळी सावित्रीबाई फुलेंचा खडतर जीवन प्रवास सावित्रीच्या लेकींनी निबंध स्पर्धेत उलगडला. यावेळी नवविवाहीतांसह वयोवृध्द महिलांनी मनोगतात त्यांचा प्रेरणादायी इतिहास सांगून आजच्या महिलांनी समाज प्रबोधनासह स्त्री शिक्षणाचे महत्व ओळखण्याचे आवाहन केले

एरंडोलमधील गढीखाली संपन्न झालेल्या जयंती कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्या तथा राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला अहिरराव होत्या. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने आणि प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त केले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्येष्ठ सदस्या शशिकला जगताप, द्वितीय क्रमांक प्रगती पाटील, तृतीय क्रमांक माधुरी भवार तर उत्तेजनार्थ बक्षिस स्वाती पाटील, यांनी पटकावले. विजयी स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांचे हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.

कार्यक़्रमासाठी चंद्रकला जैन, डॉ. उज्वला राठी, शालिनी कोठावदे, शशिकला पांडे, जयश्री पाटील, आशा निगुडकर, शैलजा अग्निहोत्री, अंजली बिडवाईकर, रश्मी दंडवते, प्राजक्ता काळे, मिना मानुधने, मनिषा महाजन आदींची उपस्थिती होती. रेखा गाढवे,  सोनाली बिर्ला, शुभांगी पाटील, मनिषा पवार, आदर्श मुख्याध्यापिका म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अंजुषा विसपुतेंचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन शोभा साळी यांनी तर आभार प्रदर्शन क्षमा साळी यांनी मानले. परिक्षक म्हणून रा. हि. जाजू शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कुळकर्णी यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी रश्मी दंडवते, शोभा साळी मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content