एरंडोल तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरासह तालुक्यात दुपारी मान्सून पूर्व पावसाची वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. दुपारी झालेल्या पावसामुळे एरंडोल शहरातील आठवडे बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.

एरंडोल येथील रविवारचा आठवडे बाजार असल्याने व्यापारी व शेतकरी आपली दुकान लावत असतानाच अचानक सुसाट वारा व मान्सून पूर्व पावसाची अचानक सुरुवात झाली. आकाशातील वातावरण एकदम मोकळे असतांना अचानक ढगांचा कडकडाटसह जोरदार वाऱ्यात पावसाला सुरुवात झाली. जवळपास २० मिनिटे पावसाच्या सरी बरसत होत्याअचानक आलेल्या वादळ व पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील काही घरांचे पत्र उडाल्याची माहिती समोर आली आहे . संपूर्ण तालुक्यात देखील जोरदार वादळामुळे काही झाडे इलेक्ट्रिक लाईन वर पडल्याने दुपारी बारा वाजेपासून लाईट बंद आहे. लाईट सुरु करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सायंकाळी पाच वाजेपावोतो शहरातील बत्ती गुल होती.

Protected Content