नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आजपासून भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाची सूत्रे घेतली आहेत. तो बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष ठरणार आहे. यासोबतच 33 महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने स्थापित केलेली प्रशासकीय समिती देखील बरखास्त होत आहे. या पदावर गांगुलीची बिनविरोध निवड करण्यात आली.
क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुलीने बुधवारी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले.बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार आज सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आहेत.
गृह मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांना सचिव करण्यात आले आहे. तर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमल यांना कोषाध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त उत्तराखंडचे महिम वर्मा उपाध्यक्ष आणि केरळचे जयेश जॉर्ज संयुक्त सचिवाचे पदभार सांभाळत आहेत.