जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचे पुज्य पिताश्री कै .अण्णासो.सुपडू नथू सुतार ( ग्रेडेड मुख्या.) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्ताने तालुक्यातील नशिराबाद येथे वैचारिक जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जो सत्यशोधक विचार राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांनी समस्त बहुजन समाजाला दिला. सत्यशोधक समाज संघ राज्य अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या प्रेरणेने पिताश्रींच्या पुण्यस्मरणार्थ सत्यशोधक विचार ही काळाची गरज विषयान्वये आदरणीय डॉ.सुरेश झाल्टे , धुळे ( राज्य सचिव – सत्यशोधक समाज संघ , महाराष्ट्र राज्य ) यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच्या अंतर्गत सुरेश झाल्टे हे सत्यशोधक विचार ही काळाची गरज यावर विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी स्वागताध्यक्ष, सत्यशोधक समाज संघ अधिवेशन पानाचे कुर्हे .मुकूंद नन्नवरे; डॉ.मिलिंद बागुल जिल्हाध्यक्ष,सत्यशोधकी साहित्य परिषद,जळगाव ; जयसिंग वाघ जिल्हाध्यक्ष, सत्यशोधकी समाज, जळगाव ; सुनिलशास्त्री महाराज अध्यक्ष वरची आळी; पंढरीनाथ विठ्ठल महाजन; प्रकाश लक्ष्मण महाजन अध्यक्ष खालची आळी; विश्वनाथ हिरालाल महाजन प्राध्यापक,राजे संभाजी शिक्षणशास्र महाविद्यालय,जळगाव यांची उपस्थिती राहणार आहे.
यासोबत जनार्दन शामराव माळी; विकास गणपत पाटील माजी सरपंच, नशिराबाद लालचंद प्रभाकर पाटील उपाध्यक्ष,जि.प.जळगाव; योगेशजी नारायण पाटील ( पिंटू दादा ) कार्याध्यक्ष, नशिराबाद शिक्षण मंडळ ; एम.टी.लुले सचिव,विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव; अरुण जाधव अध्यक्ष, विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडख;.निलेश सोनवणे;.डॉ.बी.डी.सुतार;. मनोहर रुले; दादासो.जाधव पेंटर;. युवराज माळी संचालक,अथर्व प्रकाशन ,जळगाव; सौ. संगिताजी माळी; प्रमोद पाटील सर जिल्हा समन्वयक, सत्यशोधक समाज संघ, जळगाव यांची देखील उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला लुल्हे परिवारातील मातोश्री.सिंधु सुपडू सुतार.;विजय सुपडू लुल्हे
समन्वयक, सत्यशोधक समाज संघ जळगाव; कु. सुवर्णा विजय लुल्हे; कु. समिक्षा विजय लुल्हे यांनी आयोजीत केलेले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता माळी पंच सभागृह वरची आळी , सावता माळी नगर नशिराब येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला अक्षय भुपेंद्र बुंदेल; देवेश्री विशाल कासट; श्याम कुमावत सर अध्यक्ष, कलाग्राम नशिराबाद; मोहन श्रावण माळी, तसेच
श्री साई गौरव टेन्ट इन्हेन्टस; .संदिप महाजन सर; भुषण बापूराव पाटील उर्फ राजूभाऊ फिल्टर थंड पिण्याचे पाणी जार सप्लायर्स यांचे सहकार्य लाभत आहे.
सत्यशोधकी विचारांचा जागर अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विजय लुल्हे आणि लुल्हे कुटुंबियांनी केले आहे.