यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रातील सरकारचा निषेध करण्यासाठी यावल तालुका काँग्रेसतर्फे यावल शहर पोलीस स्टेशनसमोर उद्या मंगळवार, दि.२६ जुलै रोजी शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
‘केंद्रातील भाजपचे सरकार राजकीय सूडबुद्धीने विरोधी पक्ष विशेषत: गांधी परिवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष करीत असून काँग्रेस नेत्यांना बदनाम करून त्यांची प्रतीमा मलीन करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. हे शासन केंद्रीय तपास यंत्रणेचा करीत गैरवापर करत असल्याची अशी कॉग्रेस कार्यकर्त्यांची भावना असून या विरोधात काँग्रेस पक्ष सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकजूट असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत उभे आहेत. हे दर्शविण्यासाठी आणि केंद्रातील सरकारचा निषेध करण्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रह केला जाणार आहे.
यावल तालुका काँग्रेसतर्फे यावल शहर पोलीस स्टेशनसमोर मंगळवार, दि.२६ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण सत्याग्रह केला जाणार आहे.
तरी यावल तालुक्यातील माजी आमदार सर्वच फ्रंटलचे अध्यक्ष सरपंच, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन महिला विभाग, युवक काँग्रेस, आणि सर्वच जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं. असं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणुन काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ नेते हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा यावल खरेदी विक्री सहकारी संघाचे संचालक आर. जि. नाना पाटील, जेष्ठ पदधिकारी भगतसिंग पाटील, यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, कृउबाचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील, माजी नगरसेवक तथा नगर परिषद गटनेता काँग्रेस पक्ष सय्यद युनूस सय्यद युसुफ, फैजपूर नगर परिषदचे माजी गटनेते कलिम मण्यार आदी उपस्थित राहणार आहे.