‘सत्कार’ हा जबादारीची जाण करून देणारा – ॲड. रोहिणी खडसे

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील  राजुरा ग्रामस्थांच्या वतीने ॲड.रोहिणी ताई खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी राजुरा येथील भारतीय जनता पक्षाचे शाखाध्यक्ष निनाभाऊ तायडे यांनी ॲड. रोहिणी ताई खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. तुम्ही केलेल्या माझ्या सत्कारा बद्दल मी तुमची आभारी आहे, तुम्ही केलेला सत्कार हा जबाबरीची जाणीव करून देणारा असून  तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्याने मी मला मिळालेल्या पदाला पुर्णपणे न्याय देऊन महिलांचे संघटन वाढवून पक्षाला तळागाळार्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल.  हा सत्कार भविष्यात जनसेवा करण्यासाठी बळ आणि ऊर्जा देत राहील.

भाजपाचे शाखाध्यक्ष निनाभाऊ तायडे यांचे राष्ट्रवादी काँगेस पक्षात स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीपातीचे, धर्माचे राजकारण न करता सर्व जाती धर्माला, सर्वसामन्यांना न्याय देणारा पक्ष आहे, राजुरा गावच्या विकासासाठी आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातुन आतापर्यंत निधी मिळाला आहे. भविष्यात सुध्दा आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ॲड. रोहिणीताई खडसे यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील, सरचिटणीस रविंद्र दांडगे, शिवा पाटील प्रविण कांडेलकर, प्रदीप साळुंखे, विशाल रोटे,मयुर साठे, संदीप पाटील अशोक भोलानकर , नर्मदाताई कांडेलकर, पुष्पाताई भोलानकर, राहुल रोटे, शिवशंकर भोलानकर, योगेश कांडेलकर ,निलेश बावस्कार, अंबादास येडे, रामभाऊ लोने, लक्ष्मण भोलानकर ,नरसिंह पावरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content