Home Cities जळगाव नवाब मलिकांना येऊ शकते भाजप प्रवेशाची ऑफर ! : खडसे

नवाब मलिकांना येऊ शकते भाजप प्रवेशाची ऑफर ! : खडसे


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकताच जामीन मंजूर झालेले राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना भाजप प्रवेशाची ऑफर येऊ शकते असे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

 

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे फायरब्रँड नेते नवाब मलीक यांना कालच सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यांना जामीन मिळाल्याचे अनेक नेत्यांनी स्वागत केले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करतांनाच एक शक्यता बोलून दाखविली आहे.

 

जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार खडसे म्हणाले की, शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर खूप उपकार आहेत. पवार यांनीच त्यांना राजकारणात अनेक संधी दिल्या आहेत. मलिक यांनीही खूप उत्तम काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं की नवाब मलिक हे शरद पवार यांच्याबरोबर राहतील.

 

दरम्यान, नवाब मलिक यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू असल्याचा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ही गोष्ट येणारा काळच सांगू शकेल. यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवाब मलिक हे जर भाजपात गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते. कारण भारतीय जनता पार्टीकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे. या पक्षाकडे वॉशिंग मशीनपेक्षाही भारी मशीन आहे. त्या मशीनमध्ये जर माणूस घातला तर तो स्वच्छ होतो. तो माणूस कितीही घाणेरडा असला, भ्रष्ट असला तरी तो त्यात घातला की स्वच्छ होतो, प्रामाणिक होतो. मग हे लोक त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतात, त्याला मंत्रिमंडळात स्थान देतात असे नाथाभाऊ म्हणाले.


Protected Content

Play sound