रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणाची सोडत सभेचे आयोजन

सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची महत्त्वपूर्ण सोडत सभा येत्या 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता रावेर येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील तहसील कार्यालयात होणार आहे. ही सभा तहसीलदार बी. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. ही सोडत सभा 2025 ते 2030 या कालावधीसाठी असणार असून, बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार या प्रक्रियेला अधिकृत स्वरूप देण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी 4.00 वाजता, महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सोडत सभा आयोजित करण्यात आली असून ती उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी एकतृतीयांश सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

या सोडत सभेमध्ये रावेर तालुक्यातील खालील 82 ग्रामपंचायतींचा समावेश आहे: आंदलवाडी, अटवाडे, अजनाड-चोरवड गट, आहीरवाडी गट, अजंदे, उदळी टू गट, उदळी खु., उटखेडा, ऐनपूर, कर्नाद, कळगोदा, कांटवेल, कुंभारखेडा, के-हाळे खु., के-हाळे यु., कोपुर खु., कोचुर बु., कोळोदे, खानापूर, खिरवड, खिरोदा (प्र. यावल), खिरोदा (प्र. रावेर), खिडों बु., खिर्डी खु., गहुखेडा, गाते, गौरखेडा, चिनावल, तांदलवाडी, तामसावाडी-बोरखेडा गट, तासखेडा, थेरोळे, थोरगव्हाण, दसनूर-सिंगनूर गट, दोघे, धामोडी, नांदुरखेडा, निबोल, निभोरा बु., निभोरा सिम, निराळ, नेहेते, पाडळे खु., पातोंडो गट, पुनखेड, पुरो-गोलवाडे गट, वक्षीपूर, बाजवाडी, भाटखेडा, पोकरी, भोर, मस्कावद खु., मस्कावद बु., मस्कावर्शसम, मांगलवाडी, मांगी-चुनवाडे गट, मोरगाव खु., मोरगाव यु., विटचे सांगवे गट, वाघोदे खु., वाघोदा बु., वडगाव, विवरे बु., विवरे खु., वापाडी, सुलवाडी, सावखेडा पु., सावखेडा खु., सिगत, शिगाडी-भामालवाडी गट, सुनोदा, शिंदखेडा, दोथे, रगगाव, रामपूर, रमणोपुर, रसलपुर, रोझोदा, रेभोटा, मुंजलबाटी, वाघोड, धुगखेडा. तहसीलदार बी. कापसे यांनी सर्व संबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांना वेळेवर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content