वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाची एकात्मता व देशाला एकसंघ ठेवण्यात सरदार वल्लभाई पटेल यांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात लेवा पाटील समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये लेवा पाटील समाजाच्या वतीने आज सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार वल्लभाई पटेल यांचे आज जयंती या जयंतीच्या निमित्ताने वरणगाव शहरामध्ये लेवा पाटील समाजाच्या वतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व लेवा पाटील समाजाच्या वतीने वरणगाव शहरातून मिरवणूक ही करण्यात आली