फैजपुर येथे सरदार पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

sardar patel jayanti

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान शिबिरासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड भारताचे शिल्पकार, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंती निमित्त फैजपूर शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती लेवा प्रतिष्ठान फैजपूर च्या विद्यमाने दिनांक ३० ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिर व दिनांक ३१ ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी ४ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिर सभागृहात रक्तदान शिबिर होणार असून याचे उदघाटश्र नगराध्यक्षा महानंदा होले यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. तर ३१ रोजी सायंकाळी चार वाजता शोभायात्रा निघणार असून याप्रसंगी राज्य कृषी प्रशिक्षण व परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरिभाऊ जावळे, व आमदार शिरीष चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भरत कोल्हे,हेमंत भंगाळे,प्रतीक वारके,नीरज झोपे,रितेश चौधरी,हिमांशू राणे,चिन्मय वाघूळदे,हरिभाऊ सराफ,दीपक होले तसेच सरदार वल्लभाई पटेल जयंती उत्सव समिती लेवा प्रतिष्ठान फैजपूर यांनी केले आहे.

Protected Content