चाळीसगाव ग्रामीण ठाण्याचा सपोनि रमेश चव्हाण यांनी घेतला पदभार

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथील भुमीपुत्र सहा पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी नुकतेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या सहा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार घेतला आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण यांचा जन्म तालुक्यातील सांगवी या गावी १९६५ मध्ये झाला. घरात हलाखीची परिस्थिती असल्याने परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी शिक्षण घेतले. दिवस-रात्र अभ्यास करून ते १९८५ मध्ये पोलिस म्हणून अलिबाग येथे रूजू झाले. दरम्यान रायगड जिल्ह्यात २२ वर्ष सेवा दिल्यानंतर २००६ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर ते विराजमान झाले. त्यानंतरही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. त्यांच्या कामाची दखल घेऊन २०१७ मध्ये त्यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावर नाशिक परिक्षेत्रातून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पोलिस स्थानकात बढती देण्यात आली. त्याठिकाणी त्यांनी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून एक वेगळीच ख्वाती निर्माण केली. त्याचबरोबर आरोपींचे मुसक्या आवळत गुन्हेगारांना शिक्षा ठोठावून पिडीतांना न्याय मिळवून दिला. असे कर्तव्य दक्ष अधिकारी रमेश चव्हाण यांनी नुकतीच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहेत.

 

Protected Content