पाळधी, ता. धरणगाव । येथील पत्रकार अलीम (संजू भैया) देशमुख यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाळधी पोलीस स्टेशन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पाळधी पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश बुवा, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन, संघटनेचे सल्लागार महेश बाबा झंवर, तालुकाध्यक्ष गोपाळराव सोनवणे, शहराध्यक्ष महेंद्र चौधरी आदींसह पत्रकार बांधव व पोलीस बांधव उपस्थित होते.