ट्रान्सफॉर्मरच्या तांब्याच्या तारांची चोरी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील ट्रान्सफॉर्मरमधील ४० हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या तारांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

धरणगाव तालुक्यातील रोटवद शिवारातील शेत गट नंबर ३८५/१ येथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर (४२३१११६) बसविण्यात आली आहे. या डिपीतून शेतकऱ्यांना विजपुरवठा केला जातो. गुरूवारी २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अज्ञात चोरट्याने ट्रान्सफॉर्मरमधील १२० किलो वजनाचे तांब्याचे कॉईल चोरून नेल्याचे उघडकीला आले. यासंदर्भात रोटवद येथील कनिष्ठ अभियंता अविनाश बलदेवसिंग पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार करीम सैय्यद करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!