राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध ; धरणगाव तहसिलदारांना निवेदन


धरणगाव (प्रतिनिधी)
मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक राजगृह निवासस्थानी अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. या घटनेमुळे तमाम संविधान प्रेमींच्या भावना दुखावल्या असून या गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून कडक कारवाई करावी , अशी मागणी छत्रपती क्रांती सेना यांच्या कडून करण्यात आली आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत याबाबत निवेदन नायब  प्रथमेश मोहोळ यांना देण्यात आले.

 

दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थान असलेल्या राजगृहाची समाजकंटकांनी तोडफोड केली. या घटनेने सर्व आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे राजगृह बाबासाहेबांचे निवासस्थान असून या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांचा सुमारे ५० हजार पुस्तकांचा संग्रह सर्व दुर्मीळ वस्तू या राजगृहात आहेत. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत लक्ष्मण पाटील सर व हेमंत माळी सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी , अशी मागणी छत्रपती क्रांती सेना , बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदार धरणगाव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील सर , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र ( आबा ) वाघ , बामसेफ चे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील सर , बामसेफ चे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी सर , महात्मा फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष राजेंद्र महाजन , माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी सर , भा. रा. काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष चंदन पाटील , युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे , भारत मुक्ती मोर्चाचे गौतम गजरे , राजे प्रतिष्ठान चे शहराध्यक्ष वैभव पाटील , मीडिया प्रमुख ललित पाटील , किशोर पवार सर , आकाश बिवाल सर , जेष्ठ कार्यकर्ते ओंकार माळी , रामचंद्र माळी , विजय महाजन यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content