संजय राऊतांनी ‘गाढवपणा’ थांबवावा ! : अनिल बोंडे यांचा सल्ला

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अपक्ष आमदारांवर अविश्‍वास व्यक्त करून संजय राऊत यांनी ‘गाढवपणा’ केला असून त्यांनी हा गाढवपणा थांबवावा असे नमूद करत खासदार अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

 

राज्यसभा निवडणुकीत तिन्ही जागा निवडून आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्‍वास वाढला असून या पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टिकास्त्र सोडण्यास प्रारंभ केला आहे. यात याच निवडणुकीत निवडून आलेले खासदार अनिल बोंडे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना टार्गेट केले आहे.

 

अमरावती येथे पत्रकारांशी बोलतांना अनिल बोंडे म्हणाले की, संजय राऊत यांनी  अपक्षांनी घोडे बाजार करून आपली किंमत करून घेतली अशी बदनामी केली आहे. मात्र असा ‘गाढवपणा’ त्यांना भविष्यात महागात पडू शकतो. तीन लाख लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधींवर पुराव्याशिवाय आरोप करणे हा त्या लोकप्रतिनिधींचा अपमान आहे, त्यामुळे त्यांनी हा गाढवपणा थांबवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!