बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर वन बुलढाणा मिशनचे प्रणेते संदीप शेळके यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमातून त्यांनी जिल्हावासियांना विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७० हजार ७३३ जणांनी संदीप शेळके यांना पत्र लिहून विकासाच्या संकल्पना सांगितल्या. तसेच लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला.
गेल्या वर्षभरापासून संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ सुरू केली. जिल्ह्याच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी संदिप शेळके कटिबद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संदिप शेळके यांनी यानंतर आपला प्रचार सुरू केला आहे.