Home क्राईम नांदगाव खंडेश्वर महामार्गावर खासगी बस व सिमेंट मिक्सरचा अपघात; चार जणांचा मृत्यू...

नांदगाव खंडेश्वर महामार्गावर खासगी बस व सिमेंट मिक्सरचा अपघात; चार जणांचा मृत्यू दहा जखमी

0
152


अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि सिमेंट मिक्सरचा अपघात झालाय. यात चार तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच दहाजण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे. जखमींना नांदगाव-खांडेश्वर आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सकाळच्या सुमारास क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी तरुणांचा एक गट एका खासगी बसमधून यवतमाळला निघाला होता. यावेळी खासगी बस सिमेंट मिक्सरचा ट्रकला जाऊन आदळली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बसमध्ये असलेल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. तर दहा जणांची स्थिती गंभीर असल्याचं कळतंय.
अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. या महामार्गावरील अपघातांची संख्या वाढतच आहे. रस्त्यावर खड्ड्यांची संख्या देखील जास्त आहे. सध्या गावागावात क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. त्यासाठी १४ तरुणांचा एक संघ क्रिकेट खेळण्यासाठी यवतमाळ येथे बसमधून जात होता. यावेळी हा दुर्दैवी अपघात झालाय.


Protected Content

Play sound