Breaking News : भीषण आपघातात वधुवरासह ५ जण ठार; लग्नाच्या वराती ऐवजी अंत्ययात्रा

छत्तीसगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । लग्न लागल्यानंतर परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत नववधु व नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात हा अपघात घडला. रविवारी १० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की सजवलेली कारचा अक्षरशा चुराडा झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचून तपास करत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढली. जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेले, मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. ट्रक चालकाने गाडीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण लागलं आहे. जिथे कालपर्यंत सनई-चौघडे वाजत होते, आता तिथे शांतता पसरली आहे. बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं शनिवारी रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते.

अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. धडकेचा आवाज ऐकून स्थानिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यांनी सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेलं. सर्व जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Protected Content