रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या ‘त्या’ तरूणाची ओळख पटली

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील असोदा रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळावर झोपून एका तरुणाने आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी सोशल मिडीया आणि वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर आज सोमवारी मृत तरुणाची ओळख पटली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोहर साहेबराव पाटील वय २८ रा. असोदा, असे मयताचे तरुणाचे नाव आहे. त्याने ताणतणावातून ही आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शहरातील असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर झोपून शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेत तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. शनिपेठ पोलिसांनी केलेल्या मयताच्या अंगझडतीत मयताच्या पॅन्टच्या खिशात पाकीट मिळून आले होते. त्यात मयत तरुणाचा पासपोर्ट फोटोही होता. त्यावर नावगाव मात्र नव्हते, ओळख पटावी म्हणून पोलिसांनी जळगाव शहरातील कांचन नगर, जैनाबाद, आसोदा आणि भादली गावाच्या विवीध ग्रुप मध्ये हा मयत तरुणाचा फोटो व्हायरल केला होता. 

खाजगी वाहनावर चालक म्हणून होता कार्यरत

वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यानंतर आज सकाळी मुलाचा मोठा भाऊ शिवदास कुटूंबीयांसह शनिपेठ पोलिसात आला. ओळख पटवून मयत हा माझा भाऊ असून त्याचे मनोज साहेबराव पाटील असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.  पंचनामा करुण्यात येवुन मृतदेह कुटूंबीयांना सोपवण्यात आला. मयत मनोहर याच्या पश्चात आई, भाऊ शिवदास असा परिवार आहे. मयत मनोहर खासगी वाहनांवर चालक म्हणुन कामाला होता.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!