वाळूचे ट्रॅक्टर पोलीसात जमा न करता परस्पर पळविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील शेरी गावाजवळून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धरणगाव महसूल पथकाने २ जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजता कारवाई केली असता ट्रॅक्टर चालकाने वाहन घेवून पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चौकशी अंती अखेर मंगळवारी २३ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता मंडळाधिकारी यांच्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील शेरी गावाजवळील रस्त्यावरून अवैधपणे ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मंडळाधिकारी अमोल पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने २ जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजता कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी पथकाने ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले, परंतू ट्रॅक्टरवरील चालक आकाश भागवत कोळी आणि योगेश कोळी दोन्ही रा. चांदसर ता.धरणगाव यांनी महसूल पथकाला पाहून ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात न आणता परस्पर पळवून नेले. या घटनेच्या चौकशी अंती अखेर मंगळवारी २३ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता मंडळाधिकारी अमोल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक आकाश भागवत कोळी आणि योगेश कोळी दोन्ही रा. चांदसर ता.धरणगाव या दोघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content