हुंड्याच्या ५ लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील माहेरवाशीनीला हुंड्यासाठी पाच लाखांची मागणी करत सासरी नाशिक येथे शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील माहेर असलेल्या अंकिता साईनाथ पवार वय २२ नाशिक येथील साईनाथ मल्लू पवार यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला हुंड्याचे पाच लाख रूपये माहेराहून आणावे अशी मागणी करत तिला मारहाण केली. तसेच सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून गेल्या. त्यानंतर बुधवारी १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती साईनाथ मल्लू पवार, सासू छबाबाई मल्लू पवार, ननंद छायाबाई मल्लू पवार, दिर ज्ञानेश्वर मल्लू पवार, जेठ मोहल मल्लू पवार सर्व, ननंद वैशाली शरद राठोड आणि नंदोई शरद उखा राठोड रा. नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास चव्हाण हे करीत आहे

Protected Content