भयंकर : घोडसगावजवळ भीषण अपघात; पाच जण जागीच ठार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने हे टँकर्स व क्रेनला धडक दिल्याने पाच जण जागीच ठार झाले असून लाईव्ह ट्रेंडसशी बोलतांना पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी ही माहिती दिली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावर घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध हलविण्याचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अपघाताची माहिती दिली. ते म्हणाले की, पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र आम्ही त्याचा पाठलाग करून पुढील एका ढाब्यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व मयत हे धुळे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचेही पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला सांगितले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्री य महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: