सम्यक जैन महिला मंडळाचा ब्लू काईट शॉपींग फेस्टीवल

 

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील सम्यक जैन महिला मंडळातर्फे जळगावातील उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवाची संधी मिळावी यासाठी चार दिवशीय ब्लू काईट शॉपींग फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि.१० ते १३ जानेवारीपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

लेबा बोडींग हॉलमध्ये दि.१० ते १३ जानेवारी दरम्यान ब्लू काईट शॉपींग फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात महिला उद्योजक, व्यापारी या व्यावसायिक यांच्या मार्फत बेकरी प्रॉडक्टस, अगरबत्ती, इमीटेशन ज्वेलरी, नमकुन, मुखवास, बॅण्डेड व उबदार कपडे, जैम, सॉस, केचप, साड्या, कुर्ती, घरगुती उपकरणे, चहा पावडर, मसाले, ई बाईक्स, नमकीन, लाडू तयार करण्याचे पदार्थ, बुलेट व दुचाकी वाहने, सौंदर्य प्रसाधने आदी उत्पादने विक्रीचे ३७ स्टॉल राहणार आहे. त्याठिकाणी उत्पादने पाहणीसाठी व विक्रीस उपलब्ध असणार आहे अशी माहिती सम्यक जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला टाटीया यांनी दिली. याप्रसंगी सिमा खिंवसरा, ललीत बरडीया, पारस टाटीया, प्रदीप खिंवसरा, नितीन बोरडीया आदी उपस्थित होते.

Protected Content