डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘समन्वय २के२५’ चा जल्लोषपूर्ण समारोप!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तृतीय वर्ष ‘अगस्त्य’ बॅचतर्फे आयोजित ‘समन्वय २के२५’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठ्या उत्साहात समारोप झाला. सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध मनोरंजक आणि कलात्मक उपक्रमांची रेलचेल होती.

‘समन्वय २के२५’ चे उद्घाटन हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते झाले होते. या आठवडाभर चाललेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आर्ट गॅलरी (कलाविष्कार), टॅलेंट शो (कला प्रदर्शन), प्रॉम नाईट, टिचर्स अँड जेआर नाईट (शिक्षक आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी रात्र), डिजे नाईट (संगीत रजनी), ट्विनिंग अँड फेस पेंटिंग (जुळे आणि चेहरा रंगवणे) यांसारख्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला. या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपल्यातील विविध कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले.

समारोपाच्या दिवशी शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या शुभहस्ते झाले. याच कार्यक्रमात डॉ. समर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

या समारंभाला प्रा. सुषमा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्वीकर, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, होमिओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ. चैतन्य पाटील आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रचेता मुकुंद आणि सुयश देशपांडे यांनी केले. ‘कलादालन’ (आर्ट गॅलरी) आयोजन समितीमध्ये साहिल निंगुरकर, राज पवार, वैष्णवी कावरे, सानिया कांबळे आणि अक्षदा वानखेडे यांनी परिश्रम घेतले. तर स्वागत समितीचे कामकाज ओमप्रकाश मुटकुळे, फराज रिझवी, स्नेहल चतुर, पियुष चिंचकर, देवांशू बाणासुरे, राजश्री बनकर आणि गौरी हाडे यांनी यशस्वीपणे सांभाळले. आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आणि बक्षीस वितरण करण्यात आले. ‘समन्वय २के२५’ ने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण केले होते.

Protected Content