सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल, सावदा येथे मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
पूजनाची विधी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, समाजसेवक निरज सोनवणे, तसेच नगरपालिकेचे प्रतिनिधी अरुण ठोसरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. कार्यक्रमास विशेष उपस्थिती माजी नगराध्यक्ष ताराबाई वानखेडे यांनी दर्शवली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शुभम भाऊ ठोसरे, झबा भाऊ निकम, भूषण पुरभी, दिनेश आहुजा, टारझन तायडे, गणेश तायडे, युवराज लोखंडे, शालिक ठोसरे तसेच छत्रपती संभाजी कॉम्प्लेक्सचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
या जयंती सोहळ्यात सामाजिक ऐक्य, समतेचे विचार, आणि संत रविदास महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली, ज्यामुळे सोहळा अधिकच भव्य आणि प्रेरणादायी ठरला.