फैजपूर प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी येथे देश-विदेशातील हरिभक्तांच्या तसेच देशभरातील अनेक संतांच्या उपस्थितीत सद्गुरु स्मृती महोत्सव हर्षोल्हासात होत आहे. आज या महोत्सवाचा पाचवा दिवस असून त्रिदिनात्मक महाविष्णुयोगाचा हा द्वितीय दिवस आहे.
त्रिदिनात्मक महाविष्णुयागाचा हा द्वितीय दिवस अकरा कुंड 111 पाट मध्ये किमान 125 युगुलांनी लाभ घेतला व आहुत्या दिल्या. प्रथम सत्र मध्ये वक्ताश्री सद्गुरु शास्त्री भक्तिप्रकाशदासजी सुंदर श्रीमद्भागवत अंतर्गत कृष्णाच्या बाळ लीलांच मधुर शैलीत निरूपण केले. त्या कथेतून हल्लीच्या समयात समाजाला सुंदर संदेश दिला की, आपण पालकांनी पाल्याच जीवन घडतर कसे करावे. हा संपूर्ण महोत्सव गुरुवर्य सद्गुरु शास्त्री श्री नीलकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साजरा केला जात आहे. गुरुवार्यांना भगवंताची भक्ति अत्यंत प्रिय होती. त्यांच्या मुख्य कमळातून सतत भगवंताचे नामस्मरण होत असे. सतत त्यांच्या हातामध्ये माळा असायची. गुरुवार्यांना दोन वेळा साक्षात भगवान श्री स्वामिनारायण यांची प्रत्यक्ष प्रतीति झालेली होती. निरहंकार, सरळता, प्रखर विद्वत्ता, संत लक्षण परिपूर्ण, हे काही त्यांच्या जीवनातले आभूषण समान गुण होते.
महोत्सवात मंत्रपोथीचे वाटप
गुरुवर्यांची अशी भक्ति बघून सद्गुरु स्मृती महोत्सव निमित्त मंत्रपोथी छापून वाटण्यात आली. या भक्तिकार्य मध्ये खानदेशातील सर्व भक्तांनी उत्साहपूर्ण भाग घेतला. व स्वामीनारायण महामंत्र लिहून ५ करोड २५ लाख मंत्र लेखन झाले. शास्त्री धर्मप्रसाददासजी व शास्त्री भक्तिप्रकाशदासजी या दोघांच्या संकल्पनेतून एक नवीन विचार साकारला गेला. या सर्व मंत्रलेखन झालेल्या मंत्रपोथ्या भगवान श्री स्वामिनारायण यांच्या चरणांनी प्रसादीभूत झालेल्या चरणारविंद छत्रीखाली ठेवाव्या.
छत्री व उद्घाटन
नूतन छत्रीचे बांधकाम श्री स्वामीनारायण मंदिर न्हावी येथे करण्यात आले. आरसच्या नक्षीयुक्त पत्थरातून छत्री निर्माण झाली. राजस्थानातील कारिगरांनी नक्षी करून येथे पत्थर आणला व नयनरम्य छत्री निर्माण झाली. या छत्रीखाली मंत्र पोथ्या ठेवल्याने मंत्रांचा तेज चरणारविंद मध्ये येईल व दर्शन करणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ, संकल्प पूर्ती होईल. असे हे सुंदर कार्य धर्ममार्तंड वडताल पीठाधीपति परमपूज्य धर्म धुरंधर 1008 आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज यांच्या करकमलां द्वारा भव्य उद्घाटन करण्यात आले.
भगवंतांना छप्पनभोग प्रसाद
मंदिरामध्ये भगवंताला अन्नकूट (छप्पनभोग) अर्पण झाला व आचार्यश्रींनी भगवंताची आरती उतारली. १२ ते ३ सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे ब्लड डोनेशन कॅम्प झाला. या कॅम्पच उद्घाटन आचार्य सभेमध्ये यजमानश्रींचा आचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कॅम्पमध्ये 101 संत व भक्तांनीभक्तांनी रक्तदान केले. हे रक्त फक्त गोरगरिबांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वापरल जाणार. न्हावी गावातील ब्राह्मणांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे गावातील साफसफाई करणारे कर्मचारी त्यांचासुद्धा स्टेजवर संत व महाराजश्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रंथ मराठी भाषेत प्राप्त व्हावा
भगवान श्री स्वामिनारायण यांची परावाणी म्हणजेच वचनामृत ग्रंथ. हा ग्रंथ आतापर्यंत गुजराती भाषेत होता. स्वामीनारायण संप्रदायाचा महाराष्ट्रात सुद्धा व्याप असल्याने भक्तांना प्रतीक्षा होती. हा ग्रंथ आम्हाला मराठी भाषेत प्राप्त व्हावा. भक्तांची ही संकल्पना लवकरच पूर्ण झाली. महाराजश्री यांच्या आज्ञेने, सद्गुरु शास्त्री धर्मप्रसादजी व शास्त्री भक्तिप्रकाशदासजी च्या आशीर्वादाने सद्गुरू शास्त्री भक्ति किशोरदासजींनी गुजराती वचनामृत ग्रंथाचं मराठी भाषेमध्ये अनुवाद केला. सोबत सोबत श्राव्य म्हणून वचनामृत रेकॉर्डिंग करून पेन ड्राईव्ह स्वरूपात आचार्यश्री व संतांच्या उपस्थितित प्रकाशित करण्यात आला. ज्यांना कोणाला मंत्र घ्यावयाचा असेल त्यांना लाभ मिळेल असे त्यांनी आहूत केले. दुपारच्या सत्रामध्ये आचार्यांच्या धर्मपत्नी मातोश्री सुद्धा दर्शनाचा लाभ देतील. महिला भक्तांना मंत्र सुद्धा दिला व आशीर्वाद दिले.
महोत्सवाचे दुपार सत्र
दुपारच्या सत्रामध्ये वक्ता श्री सुंदर कथा रसपान करुन करविले. बालकृष्ण प्रभू वनामध्ये गायी घेऊन मित्रांसह जायचे व अनेक चरित्रे करायचे. तसेच प्रत्यक्ष चित्रण कथामंडप मध्ये सजीव देखावे यांसह गोपाळकाला. ज्याप्रमाणे कृष्ण मित्रांसह वनात जाऊन भोजन करायचे तत्वत प्रत्यक्ष सजीव देखावा साजरा झाला व तोच प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यात आला.
विद्यार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
परमपूज्य धर्म धुरंधर आचार्य महाराज श्री यांनी सुंदर आशीर्वाद दिले व खानदेशातील सत्संगाचे कौतुक केले. खान्देशातील संतांचे कौतुक केले. शास्त्री धर्मप्रसादजी व शास्त्री भक्तिप्रकाशदासजी या संत मंडळाची उत्तम सेवा खानदेश सत्संग समाजाला मिळत आहे. गुरुकुलच्या मार्फत संस्कृतीचे रक्षण व सत्संगाचे पोषण होत आहे. रात्री कार्यक्रमांमध्ये आज रात्री श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था सावदा येथील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम करतील. हा कार्यक्रम मनोरंजनात्मक नव्हे परंतु मार्गदर्शनात्मक सुद्धा असेल.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी परमपूज्य धर्म धुरंधर 1008 आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज, पूज्या मातोश्री, महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्म प्रसाददासजी, उपाध्यक्ष शास्त्री ज्ञानप्रकाशदासजी (गांधीनगर), के.पी. स्वामी (भावनगर), माधव स्वामी (नाशिक), बालमुकुंद स्वामी, हरीवल्लभ स्वामी, जे.पी. स्वामी (वडोदरा), विष्णू स्वामी (भावनगर), निर्लेप शास्त्री (बोरसद), सार्थक नेहेते (क्राइम ब्रांच नागपुर), हरिभाऊ जावळे (माजी आमदार) इत्यादी महानुभाव उपस्थित होते.