जळगाव मनपा पथकाने दिले शेंदुर्णी येथे अग्निशमन वाहन हाताळणी प्रशिक्षण

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीचे नवीन अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. या वाहनाची व साहित्याची माहिती देत जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

 

जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आज शेंदुर्णी येथे येवून अग्निशमन वाहनाची व सहित्याची माहिती दिली. यात त्यांनी वाहन आपत्कालीन परिस्थिती कसे हाताळावे याचे तेथील कर्मचाऱ्यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण दिले. त्यावेळी तेथे शेंदुर्णी शहरातील गोविंद शेठ अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते अमृत खलसे(बारी)व मुख्याधिकारी पिंजारी व नगरपंचायत मधील कर्मचारी आदींची उपस्थिती होती. जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, फायरमन रोहिदास चौधरी, भारत बारी व वाहन चालक देविदास सुरवाडे यांनी त्यांना अग्निशमनाचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले.

Protected Content