रस्ते, गटारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिकेत आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील विविध भागातील अतिक्रमण, रस्ता आणि गटारींची समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात या मागणीसाठी मंगळवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त डॉ. वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट या परिसरातील रस्त्यांसह वाल्मिक नगर, कांचन नगर, दिनकर नगर, तानाजी मालसुरे नगर आणि लेंडी नाल्यापासून ते श्रीराम चौकापर्यंत गटारी व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय व बिकट झाली आहे. याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. गटारी आणि रस्त्यांबाबत महापालिकेत अनेक निवेदने व तक्रारी देण्यात आल्यात परंतू याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. यासह महात्मा गांधी मार्केट, चौबे मार्केट या रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रेते यांनी कायमस्वरूपी अतिक्रमण करून पायी जाण्याचा रस्ता देखील उपलब्ध नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या समस्या सोडविण्यात याव्यात अन्यथा स्थानिक रहिवाशी राष्ट्रवादी काँग्रेच्या सहकार्याने महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी, राजू मोरे, भगवान सोनवणे, सुशिल शिंदे, किरण राजपूत, अकिल पटेल, रहिम तडवी, बशीर खाटीक, जॉन सोनवणे, अभिलाशा रोकडे, राहूल टोके यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.