जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय आंतर शालेय उर्वरित स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये अनुभूती इंटरनॅशनल स्कूल शिरसोली ने लॉर्ड गणेशा जामनेरचा १-० ने पराभव केला तर मुलींमध्ये रुस्तमजी इंटरनॅशनल शिरसोली ने सेंट अलायसेस भुसावळचा पेनल्टी मध्ये ४-३ ने पराभव करीत विजय मिळविला.
मुलींमध्ये रुस्तमजीची आर्या व स्वरा दशहरे यांना तर मुलांमध्ये अनुभूतीचा ओम धोते यास उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. मुलींमध्ये तृतीय स्थानासाठी बुरहानी इंग्लिश मीडियम पाचोरा विरुद्ध एन एस एम विद्यालय पारोळा यांच्यात सामना रंगला व बुरहानी १-० तृतीय स्थान पटकावले. मुलांमध्ये सेंट मेरी अमळनेरने पंकज ग्लोबल चोपडा वर ३-० ने विजय मिळवत तुतीय स्थान पटकाविले.
पारितोषिक समारंभासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे व एकलव्यचे श्रीकृष्ण बेलोरकर, अल इमदास फाउंडेशनचे मतीन पटेल, जर्जिस फाउंडेशन वरणगावच्या शबिना खान, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, बुद्धिबळचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे व वाल्मीक पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख व सहसचिव अब्दुल मोहसिन, क्रीडा अधिकारी सुरेश तिरकुदे, यांच्या हस्ते विजेते उपविजेते संघातील खेळाडूंना सुवर्ण, रजत व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.