पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर गावाजवळ असलेल्या बालाजी पेट्रोल पंपाजवळ भरधाव लक्झरीची उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार धडक दिल्याने लक्झरी चालकासह सहा प्रवाशी जखमी झाल्याची घटना गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात लक्झरी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर गावाजवळ असलेल्या बालाजी पेट्रोल पंपाजवळ औरंगाबादकडून पहूर येथे येत असलेल्या लक्झरी बस क्रमांक (एमपी 15 पीए ४४८८) ही गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता येत असताना ट्रक चालकाचे दुर्लक्ष झाल्याने भरधाव वेगाने जाणारी लक्झरी उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक (एमएच ४० बीजी ७१२८) याला जोरदार दिली. या धडकेत लक्झरी चालक सचिन कडवा पटेल रा. पटेलनगर, मध्यप्रदेश यासह प्रवासी शितल सुंदरलाल मोरे रा. पुणे, सुभाष हरचंद मालचे, गणेश सुभाष मालचे दोन्ही रा. नेपानगर, मध्यप्रदेश, सुभाराम भावसिंग चव्हाण रा, बऱ्हाणपूर, दुर्गेश राम चौरसिया आणि सुनील मांगीलाल तांबडे दोन्ही रा. खरगोन असे एकूण ७ जण जखमी झाले आहे. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दुर्गेश राम चौरसिया (वय-४०) रा. हरदा, मध्यप्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी चालक सचिन कळवा पटेल रा. पटेल नगर, खरगोन, मध्यप्रदेश यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.