जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ गांजा घेवून नशा करणाऱ्या तरूणावर मंगळवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा एनडीपीए कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक जण गांजाचा नशा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने मंगळवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता कारवाई केली. त्यावेळी त्यांनी संशयित आरोपी मनोहर प्रकाश भोसले वय ३२ रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव याला ताब्यात घेतले. त्यांच्या कडून गांजा पिण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी पोहेकॉ हरीलाल लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सतिष पाटील हे करीत आहे.