यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी ऑल इंडिया केमिस्ट्स संघटनेच्या आवाहनानुसार औषध विक्री बंद ठेवली आणि याबाबत यावल पोलीस स्टेशनला निवेदन दिले. हा बंद ऑनलाइन औषध विक्रीला विरोध, कॉर्पोरेटर्सच्या मनमानी निर्णयांना विरोध, तसेच बनावट औषधांच्या धोका टाळण्यासाठी करण्यात आला असल्याचे ऑल इंडिया केमिस्ट्सचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झंवर यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी या बंद बाबतीत आपले निवेदन पोलीस प्रशासनास सादर केले. यावल तालुक्यातील तालुकाध्यक्ष मनीष कौठळकर, दिलीप महाजन, प्रशांत कासार व भानुदास महाजन, तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन महाजन, श्रीराम मुरलीधर धनगर, तोसिब रजा यांनी यावल पोलीस स्टेशनवर निवेदन दिले.

तसेच उपाध्यक्ष जाबीर खान, सचिव संजय चौधरी व कार्यकारणी सदस्य चंदन महाजन आणि मनीष चौधरी यांनी फैजपूर पोलीस स्टेशनलाही सदरच्या बंद बाबतीत निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, हा बंद औषधांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि नागरिकांना बनावट औषधांच्या धोका पासून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
जिल्हा कार्यकारणी सदस्यांनी सर्व औषध विक्रेत्यांना एकत्रितपणे या मुद्द्यावर जागरूक होण्याचे आवाहन केले असून, भविष्यात अशा उपक्रमांद्वारे औषध क्षेत्रातील नियमांचे पालन आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.



