Home आरोग्य ‘कोरोना’च्या भीतीने नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

‘कोरोना’च्या भीतीने नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
43


 

नाशिकरोड (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या भीतीमुळे नाशिकरोडमधील प्रतीक राजू कुमावत (वय ३१ रा. श्रीकृष्ण कॉलनी, चेहेडी पंपिंग स्टेशन) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

प्रतीक कुमावत याचा गेल्या दोन-तीन दिवसांपासून घसा दुखत होता. त्यामुळे आपल्याला कोरोनाच्या संसर्गाच्या संशयाने घेरले होते. प्रतिक हा प्लंबिंगचे काम करीत असे. त्याने एका खासगी डॉक्टरांकडे उपचारही घेतले होते. परंतु, शनिवारी सकाळी अचानक त्याने घरातील लोखंडी पाईपला साडी बांधून त्यानं गळफास घेतल्याचे उघडकीस आले. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली असून त्यात कोरोना आजाराच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याचे नमूद आहे.


Protected Content

Play sound