पहूर येथे पोलिसांचे पथ संचलन

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन यानंतर शहरातून पथ संचलन करण्यात अले.

पहूर पोलीस स्थानकाच्या वतीने बकरी ईद सणाच्या पुर्वसंध्येला कुरेशी, खाटीक समाज बांधवांची मिटींग घेवुन त्यांना कायद्या बाबत सुचना देवुन,उघड्यावर विनापरवानगी जनावरांची कुरबानी करू नये, बाबत सुचना देवुन सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस अदा करण्यात करण्यात आल्या. यानंतर शहरातून रूट मार्च (पथ संचलन) काढण्यात आला. या वेळी चार अधिकारी ,पहूर पोलिस ठाण्याचे १५ कर्मचारी, १२ होमगार्ड हजर होते. सदरचा रूट मार्च शेंदूर्णी व पहूर शहर मध्ये संमिश्र लोकवस्ती मधुन काढण्यात आला.

दरम्यान, मुस्लीम समाजबांधवांनी घरी राहूनच बकरी ईदचा सण साजरा करावे असे आवाहन पहूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राकेशसिंह परदेशी यांनी केले आहे.

Protected Content