चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील पानशेवडी पाडा येथील आदीवासी गावातील प्राथमिक शाळेत रोटरी गोल्डसीटीच्या वतीने खेळ, व्यायामाच्या साहित्याचे मान्यवरांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले
रोटरी गोल्डसीटी गेल्या चार वर्षांपासून काम करत आहे. या आदीवासी पाड्यावर २०० लोकांची वस्ती आहे. येथील आदीवासी मुलांची परिस्थिती पाहून त्यांच्यासाठी ओपन जीम, वृध्दांसाठी बसण्यासाठी बाक आणि लहान मुलांसाठी खेळणीचे साहित्य देण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख सैंदाणे, राकेश पाटील, सरपंच बानुबाई रूबाब तडवी, माजी सरपंच रूबाब तडवी, पोलीस पाटील शहजाद तडवी, पोलीस पाटील गंदस बारेला, पानशेवडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुस्तफा तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांतपाल उमंग मेहता, सचिव डॉ. निरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख राकेश सोनी, डॉ. सुर्यकिरण वाघण्णा, प्रखर मेहता, मेहूल त्रिवेदी, निलेश जैन, प्रवेश मुंदडा, प्रशांत कोठारी, निखील चौधरी, प्रिती मंडोरा यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.