पो.नि. धनंजय येरूळे यांची ४०० किलोमीटरची शर्यत पूर्ण

जळगाव प्रतिनिधी ।  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी २४ तास ४० मिनिटात ४०० किलोमीटरची सायकलची शर्यत पूर्ण केली आहे. औरंगाबाद येथे १४ व १५ ऑगस्ट या दोन दिवशी पॅरिस येथील ऑडिक्स या कंपनीतर्फे ऑडिक्स इंडिया या नावाने सायकल रायडिंग स्पर्धा झाली.

सविस्तर माहिती अशी की, धनंजय येरुळे हे मूळ लातूर येथील रहिवासी आहेत. एक ते दीड वर्षापासून जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निरोगी राहण्यासाठी गेल्या चार वर्षापासून धनंजय येरुळे हे नियमित सकाळी सायकल चालवितात. या सरावात त्यांना औरंगाबाद येथील ऑडिस्क इंडिया या सायकल रायडिंग स्पर्धेची माहिती मिळाली. त्यात धनंजय येरुळे हे ४०० किलोमीटर साठी सहभागी झाले. २७ तासात ही स्पर्धा त्यांना पूर्ण करावयाची होती. १४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील क्रांती चौकातून सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद, ते देवगड फटा, तेथून पुन्हा औरंगाबाद ते मांजरसोफा पुन्हा क्रांती चौकात परत अशी स्पर्धा झाली. येरुळे यांनी २४ तास ४० मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेची माहिती पॅरिस येथे जाणार असून ते मुल्यांकनानंतर प्रमाणपत्र व मेडल दिली जाणार आहे अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी बोलतांना सांगितले.

Protected Content