चोपडा येथील रोटरी क्लबची कार्यकारीणी जाहीर

rotary club chopda

चोपडा प्रतिनिधी । येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन जैन तर सचिवपदी धिरज अग्रवाल यांची निवड झाली असून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.सौ.कांचन टिल्लू, सचिवपदी सौ.चेतना बडगुजर, तर रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.ललित चौधरी, सचिवपदी प्रणय टाटीया यांची निवड झाली आहे.

चोपडा रोटरी क्लबच्या ४८ वर्षे पूर्ण होऊन ४९ व्या वर्षात पदार्पण करत आहे या ४९ व्या वर्षाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीत- उपाध्यक्ष नितीन अहिरराव, मावळत्या अध्यक्षा सौ पूनम गुजराथी, सहसचिव अविनाश पाटील, कोष्याध्यक्ष विनोद अग्रवाल, कार्यकारिणी सद्स्य नंदकिशोर पाटील डॉ. नीता जैस्वाल, प्रविण मिस्तरी,अनिल अग्रवाल, ईश्‍वर सौंदनकर, डॉ वैभव पाटील, रूपेश पाटील, चेतन टाटीया, पंकज बोरोले, एम.डब्ल्यू.पाटील, संजीव गुजराथी, आशिष गुजराथी, बी.एम.पाटील, एल.एन. पाटील, ललीत टाटीया, धिरेंद्र जैन आदींचा समावेश आले.

दरम्यान, नूतन पदाधिकार्‍याचा पदग्रहण समारंभ ३ जुलै रोजी सायंकाळी आंनदराज पॅलेस, चोपडा येथे होणार आहे. याप्रसंगी भोपाळ येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३०४० चे प्रांतपाल रोटे. धीरेनजी दत्ता यांच्या हस्ते पद्ग्रहण समारंभ होणार आहे. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उपप्रांतपाल अनिल अग्रवाल (जळगाव), व उपप्रांतपाल विलास एस.पाटील, हे हजर राहणार आहेत. यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सौ.पूनम गुजराथी, सचिव अनिल अग्रवाल, हे प्रयत्न करत आहेत.

Protected Content